महाराष्ट्रातील पहिले "व्हिलो ६७ अर्बन व्हिला"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:02 AM2021-02-21T04:02:02+5:302021-02-21T04:02:02+5:30
मकरंद देशपांडे संचालक चौधरी भाईश्री लॅण्डमार्क्स एलएलपी या नामांकित बांधकाम संस्थेच्यावतीने पैठणरोडवरील इटखेड परिसरात महाराष्ट्रातील पहिला ''व्हिलो ६७ अर्बन ...
मकरंद देशपांडे
संचालक
चौधरी भाईश्री लॅण्डमार्क्स एलएलपी या नामांकित बांधकाम संस्थेच्यावतीने पैठणरोडवरील इटखेड परिसरात महाराष्ट्रातील पहिला ''व्हिलो ६७ अर्बन व्हिला'' हा भव्य ४ बीएचके रोबंगलोचा प्रकल्प उभारला जात आहे. महाराष्ट्रातील पहिला यासाठी म्हटले जात आहे की, येथे तळमजल्यावर प्रत्येक रोहाऊससाठी दोन कार पार्किंग व एक सर्व्हंट रूम देण्यात येत आहे. त्यानंतर ११ फूट उंचीवर साडेतीन एकरचा स्लॅब आहे. यास ''पोडीम फ्लोअर'' असे म्हटले जाते. त्यावर ६७ रोबंगलो उभारण्यात येत आहेत. ''पोडीम फ्लोअर'' हा भाग पूर्णपणे ''व्हेईकल फ्री एरिया'' असणार आहे. येथे आबालवृद्धांना मनसोक्त व बिनधास्त वावरता येणार आहे. रोबंगल्याच्या हॉलमधूनच गार्डन, योगा केंद्र, आदी अमेनिटीमध्ये जाता येईल.
मुख्य रस्त्यावरून थेट तळमजल्यावर पार्किंगमध्ये जाता येणार आहे. येथेच सर्व युटिलिटीची सुविधा देण्यात आली आहे. अशी व्यवस्था असणारे हे एकमेव गृह प्रकल्प तेही वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याशिवाय पैठण रोडवर मनपा हद्दीत भाईश्री नक्षत्रबन व बीडबायपास रोडवरील भाईश्री अक्षरबन या प्रकल्पाची माहिती प्रदर्शनात देण्यात येत आहे.