पाझर तलावात पाण्याअभावी माशांचा तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:02+5:302021-05-23T04:04:02+5:30
घोसला : सोयगाव तालुक्यातील पाझर तलावातील पाणी आटल्याने तलावांमध्ये मृत मासे आढळून येत आहेत. तर मृत माशांच्या दुर्गंधीने घोसला ...
घोसला : सोयगाव तालुक्यातील पाझर तलावातील पाणी आटल्याने तलावांमध्ये मृत मासे आढळून येत आहेत. तर मृत माशांच्या दुर्गंधीने घोसला शिवारातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
तालुक्यात लघुसिंचन आणि जिल्हा परिषद सिंचन विभागाचे ११७ पाझर तलाव आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत या तलावांनी पाण्याची धोकादायक पातळी गाठली होती. मात्र, वाढत्या उन्हाच्या कडाक्याने बाष्पीभवन होऊ लागल्याने पाझर तलावे आटू लागली आहे. त्यामुळे तलावात मृत माशांचा खच आढळून येत आहे. दुसरीकडे पाझर तलावांवर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. पाझर तलावांपाठोपाठ प्रमुख धरणांची पाणी पातळी मृतसाठ्यावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सोयगाव तालुक्यात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास पाण्यासाठी सोयगाव तालुक्यातील नागरिकांना मात्र पायपीट करावी लागणार आहे.
फोटो : कोरडेठाक झालेले घोसला शिवारातील पाझर तलाव आणि दुसऱ्या छायाचित्रात मृतावस्थेत असलेले मासे.
220521\img-20210522-wa0299_1.jpg~220521\img-20210522-wa0301_1.jpg
पाझर तलावातील पाणी आटल्याने तलावाची झालेली अवस्था~