आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

By Admin | Published: November 25, 2015 10:58 PM2015-11-25T22:58:14+5:302015-11-25T23:24:12+5:30

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे.

Fishery's contribution to prevent suicides | आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

googlenewsNext


बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. आत्महत्या रोखण्याासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बीडचा आकडाही पावने तिनशेच्याजवळ जावून पोहचला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून मत्स्य व्यवसायासंदर्भात योजनांची अंमलबजावणी करता यावी, यासाठी ८ एप्रिल २०१५ ला मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली आणि ३० जुलै २०१५ ला योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा बीडमध्ये लाभ घेण्यास सुरूवात झाली असून, मत्स्यबीजासाठी १४ अर्ज आले असून ९ अर्ज फिरते वाहन देण्यात यावे, यासाठी आले आहेत.
१०० टक्के अनुदान
कृषी विभागाने बांधुन दिलेल्या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमुदही करण्यात आलेले आहे. तसेच एका तलावात एक हजार मत्स्य बोटुकली आणि एक हजार कोळंबी बीज संचयन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fishery's contribution to prevent suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.