माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ झाल्याच्या शहरात पाच तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:05 AM2021-08-17T04:05:01+5:302021-08-17T04:05:01+5:30
औरंगाबाद : शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच विवाहितांचा छळ करण्यात आल्याच्या प्रकरणात १४ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले ...
औरंगाबाद : शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच विवाहितांचा छळ करण्यात आल्याच्या प्रकरणात १४ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार एका पीडितेला सासू व पतीने रिक्षा घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी सलिम गुलशन खान याच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत घर घेण्यासाठी माहेरहन ४० लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पराग सुरेश मुंगीकर यांच्यासह दोन महिला आरोपींच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत आरोपी पती मोतीपुरी उर्फ अमोल सुभाष गोसावी, सुभाष शिवपुरी गोसावी यांच्यासह एका महिलेने विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी चारित्र्यावर संशय घेत मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून विवाहितेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, तसेच तुला मुलगा होत नाही, म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात येत होता. या प्रकारणात पीडितेच्या तक्रारीवरून पती नित्यानंद नामदेव साळवे, दीर दयानंद नामदेव साळवे यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचव्या घटनेत माहेरहून सोने व पैसे घेऊन येण्याच्या मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यासाठी विवाहितेला त्रास दिला जाता होता. या त्रासाला कंटाळून विवाहितेने अजिंक्य गोणचारी, नागनाथ बसवराज गोणचारी, अनुप नागनाथ गोणचारी, ऋषिकेश स्वामी, विश्वनाथ बसवराज गोणचारी यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.