पाच दिवसांची पोलिस कोठडी
By Admin | Published: June 1, 2014 12:14 AM2014-06-01T00:14:39+5:302014-06-01T00:25:56+5:30
पूर्णा : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस जीवे मारणार्या पतीसह अन्य चार जणांना पूर्णा न्यायालयाने ३१ मे रोजी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पूर्णा : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस जीवे मारणार्या पतीसह अन्य चार जणांना पूर्णा न्यायालयाने ३१ मे रोजी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील एरंडेश्वर येथील राधा अनंता काळे हिच्या चारित्र्यावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. पती अनंता सुदाम काळे व अन्य नातेवाईकांनी संगनमत करुन २१ मे रोजी स्वत:च्या शेतात पत्नी राधाचा खून केला. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून तिचे प्रेत जाळून टाकले. अंत्यविधीच्या ठिकाणची हाडे व राख अज्ञातस्थळी टाकून पुरावा नष्ट केला. या प्रकरणाची माहिती कुणासही लागू दिली नाही. या प्रकरणाची माहिती पूर्णा पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला असता या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिस नाईक अशोक हाके यांच्या फिर्यादीवरुन पती अनंता ऊर्फ अनिल सुदाम काळे, सासरा सुदाम प्रसादराव काळे, मयताचा भाऊ शेषराव बाबूराव भालेराव, मामा दिलीप माणिकराव खटींग, सासू शारदा सुदाम काळे, कालिंदीबाई बाळासाहेब काळे, बालासाहेब प्रसाद काळे, रेखा ज्ञानोजी काळे या आठ जणांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ मे रोजी पूर्णा न्यायालयात पतीसह अन्य चार आरोपींना हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक योगेश् कुमार, पोलिस नायक अशोक हाके, पोकॉ.अनिल भराडे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)राधा अनंता काळे या विवाहितेच्या मृत्यूची कुणकुण पूर्णा पोलिसांना लागली होती. परंतु, ठोस पुरावा नसल्याने पाच दिवसांपासून पोलिस ग्रामस्थांशी चर्चा करीत होते. यामध्ये पोना.अशोक हाके व अनिल भराडे यांनी माहिती घेतली. या माहितीची शाहनिशा केली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक योेगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही.एन.जटाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे विवेक मुगळीकर, फौजदार राहुल भवळे व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जावून या खुनाचे गूढ उलगडले.