पाच उच्चशिक्षीत तर एक बारावी उत्तीर्ण आमदार

By Admin | Published: October 20, 2014 12:10 AM2014-10-20T00:10:47+5:302014-10-20T00:33:57+5:30

बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघातील जनतेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये पाचजण उच्चशिक्षित आहेत तर एक मात्र केवळ बारावी उत्तीर्ण आहे.

Five highly educated candidates, one pass for the 12th pass | पाच उच्चशिक्षीत तर एक बारावी उत्तीर्ण आमदार

पाच उच्चशिक्षीत तर एक बारावी उत्तीर्ण आमदार

googlenewsNext


बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघातील जनतेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये पाचजण उच्चशिक्षित आहेत तर एक मात्र केवळ बारावी उत्तीर्ण आहे.
जिल्ह्यात ११ तालुक्यांसाठी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदार संघाचा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. यामध्ये बीडमूधन राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारली़ त्यांनी अभियंत्याची पदवी मिळविलेली आहे. आष्टी व गेवराईचे उमेदवार भीमराव धोंडे आणि अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे.
दोन महिलाही विधानसभेत गेल्या आहेत़ यापैकी पंकजा मुंडे यांचे शिक्षण एम.बी.ए़ झालेले असून केजच्या संगीता ठोंबरे या एम.ए.बी़एड. (इंग्रजी) आहेत़ त्या खोलेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मात्र राजकीय प्रवेशानंतर त्यांनी नोकरी सोडली़
माजलगावचे आमदार आर.टी.देशमुख यांचे शिक्षण सर्वात कमी आहे़ ते केवळ बारावी उत्तीर्ण आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Five highly educated candidates, one pass for the 12th pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.