पाच महिन्यांनंतर पुन्हा ‘टास्क फोर्स’ कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:02 AM2021-02-20T04:02:26+5:302021-02-20T04:02:26+5:30
सर्व यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेऊन कोरोनाबाबत स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही त्यांनी सुचविले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ...
सर्व यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेऊन कोरोनाबाबत स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही त्यांनी सुचविले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली. बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मणीयार, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. सुधाकर शेळके, आदींसह खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.
या बैठकीत खालील निर्णय झाले.
टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, ग्रामीण रुग्णालये सुसज्ज ठेवावीत,
एस. टी. बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा. ऑटो रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणाऱ्यांवर आरटीओंनी कारवाई करावी.
चौकट..
शाळा २८ तारखेपर्यंत
महापालिका क्षेत्रातील ५ वी ते ९ वी पर्यंतच्या शाळा २८ फेब्रुवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केला. १० ते १२ च्या परीक्षांचा विचार करून क्लासेस चालू ठेवण्यात येणार आहे.