पूर्णा नदीच्या पात्रात पाच नवीन बॅरेजेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:17+5:302021-05-22T04:05:17+5:30
गोदावरी महामंडळाच्या औरंगाबाद येथे सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. या बैठकीस के. बी. ...
गोदावरी महामंडळाच्या औरंगाबाद येथे सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. या बैठकीस के. बी. कुलकर्णी, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद, डी.बी. तवार मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग औरंगाबाद, मनोज अवलगावकर अधीक्षक अभियंता, समाजकल्याण सभापती राजू राठोड, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. यावेळी सत्तार म्हणाले की, प्रकल्पातील सर्व गाळ काढून शेतकऱ्यांना वाटून द्यावा. खेळना प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रलंबित अहवाल सादर करावा, तालुक्यातील मध्यम प्रकल्पाच्या धरण, पाणीसाठ्याच्या जमिनीची मोजणी करून सीमा निश्चिती कराव्यात, अतिक्रमण हटवून संबंधित यंत्रणांनी ती जागा ताब्यात घ्यावी. तसेच सिल्लोड तालुक्यातील खेळना, अंजिंठा, सोयगाव, केळगाव यासह इतर प्रकल्पातील सर्व गाळ काढून शेतकऱ्यांना तो वाटून द्यावा. भराडी प्रकल्पाची मंजुरी रद्द झाल्याने त्या पाण्याच्या उपलब्धतेतून सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात पाच बॅरेजेस बांधण्याच्या कामांचे सर्वेक्षणाचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी दिले.