विचित्र अपघातात पाच प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:52 PM2019-02-23T23:52:44+5:302019-02-23T23:52:56+5:30
सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार समोरून येणाऱ्या दुसºया कारवर आदळली. या विचित्र अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
वाळूज महानगर : सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार समोरून येणाऱ्या दुसºया कारवर आदळली. या विचित्र अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीत एका गर्भवती महिलेचा समावेश असून, ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली.
शिवाजी चिकणे शनिवारी सायंकाळी शहरातून नातेवाईकांना घेऊन कारने (एमएच २०, ईवाय- १८४९) सिडको वाळूज महानगरातील घरी येत होते. सिडको वाळूज महानगरातील वाहतूक सिग्नलवर वळण घेण्यासाठी थांबले होते. दरम्यान, साडेसहा वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव औरंगाबाद-पुणे या शिवशाही बसने (एमएच-०४, के- ०७५२) कारला जोराची धडक दिली. या धडकेमुळे उभी असलेली कार पंढरपूरकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाºया अमित शर्मा यांच्या कारवर (जीजे-०६, केडी- ६१९३) आदळली. या अपघातात पूजा नवघरे (२५), गोखरणा नवघरे (६०), बालाजी नवघरे (३०), श्रद्धा चिक णे (१५) व शिवाजी चिकणे हे जखमी झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती.
परीक्षेसाठी आलेली महिला जखमी
या विचित्र अपघातात जखमी झालेली पूजा नवघरे ८ महिन्यांची गर्भवती आहे. औरंगाबाद येथे रविवारी कृषिसेवक पदाची परीक्षा असल्याने त्या परभणी येथून आल्या आहेत. शनिवारी सिडको वाळूज महानगरातील नातेवाईकांच्या घरी कारमधून येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
बसचालकाला पकडले
शिवशाहीच्या बसचालकाने घटनास्थळावरून बस सुसाट वेगाने पळवीत फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पंढरपुरातील तिरंगा चौकात शिवशाही बसचालक शिवनाथ राजेंद्र केदार (रा. शाहूगाव, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
फोटो ओळ - सिडको वाळूज महानगरातील सिग्नलवर झालेल्या विचित्र अपघातात कारची अशी अवस्था झाली. दुसºया छायाचित्रात अपघातास कारणीभूत असलेली शिवशाही बस.