खिर्डीत कोरोनाचे पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:51+5:302021-03-14T04:05:51+5:30
जि. प.चे मुख्य कार्यकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली पाहणी परिसर स्वच्छ ठेवून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन लोकमत न्यूज ...
जि. प.चे मुख्य कार्यकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली पाहणी
परिसर स्वच्छ ठेवून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : तालुक्यातील खिर्डीत कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली असून, शनिवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी भेट देऊन गाव परिसराची पाहणी केली. गावात स्वच्छता व फवारणी करून खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कवडे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे यांनी भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी डॉ. गोंदावले म्हणाले की, ग्रामपंचायत हद्दीत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण निघाल्यास एकामागे किमान २० नागरिकांच्या टेस्ट करणे आवश्यक आहे. यासह परिसर सील करत औषधांची फवारणी करून सॅनिटाईज करावे, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर मातकर, उपसरपंच कृष्णा दवडे, सदस्य नवनाथ हिवरडे, संदीप पांडव, काकासाहेब वरकड, सुरेश हिवरडे, सुभाष मगर, संतोष दवडे, ग्रामसेवक एम. एल. बैनवड, ज्योती हिवरडे, गायत्री दवंडे आदी उपस्थित होते.
-- कँप्शन :
खिर्डी गावाच्या पाहणीनंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह इतर.