कामगारांना मारहाणप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:42 PM2019-01-12T20:42:48+5:302019-01-12T20:43:01+5:30

पंधरा दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीच्या पाच कामगारांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Five people booked for rioting | कामगारांना मारहाणप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

कामगारांना मारहाणप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

वाळूज महानगर : पंधरा दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीच्या पाच कामगारांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाळूज एमआयडीसीतील केसरदिप प्रेसिंग या कंपनीत काम करणारे कामगार व कंपनी व्यवस्थापनात काही दिवसांपासून वाद सुरु आहे. कामगारांना कायमस्वरुपी करावे, यासाठी कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, २९ डिसेंबरला कंपनीत काम करणाऱ्या महादेव भोटकर, जाकिर शहा, पांडुरंग जवरे, फिरोज शेख, भरत फोलाणे या कामगारांचे ठेकेदार व इतरांनी अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र ठेकेदार व त्याच्या साथीदारारिुध्द कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला होता. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून ३२ कामगारांचे जबरीने राजीनामे घेण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला होता.


या कंपनीच्या कामगारांना अमानुष मारहाण झाल्याचे वृत्त लोकमतने नुकतेच प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी कानउघाडणी केल्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात महादेव भोटकर यांच्या फिर्यादीवरुन सुपरवायझर आनंद पाटेककर, योगटेश पाटेकर, माऊली ढोकणे व अन्य दोन अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Five people booked for rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.