विद्यापीठातर्फे पाच जणांना ‘जीवनगौरव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:22 AM2017-08-24T01:22:17+5:302017-08-24T01:22:17+5:30
विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन करणाºया प्राध्यापकांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सुरू केली आहे. यावर्षी प्रशासनातील दीर्घ अनुभवी सेवानिवृत्त भुजंगराव कुलकर्णी, विधि क्षेत्रातील न्यायमूर्ती सी. एल. थुल, सामाजिक कार्यातील डॉ. विश्वनाथ कराड, पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ. जगन्नाथ पाटील यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक करताना कुलगुरू म्हणाले, विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाºया मान्यवरांचा गौरव विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. हा ज्ञानवंतांचा सत्कार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या सन्मानपत्राचे लेखन डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. भारती गोरे, संजय शिंदे यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन प्रा. पराग हासे, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. अपर्णा अष्टपुत्रे, डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच अरविंद भालेराव, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, दिनेश कोलते, दिवाकर पाठक, प्रा. सचिन भालशंकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्य संख्येने उपस्थित होते.