रेखा हसे मृत्यू प्रकरणी सासरच्या ५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:37 PM2017-07-24T18:37:47+5:302017-07-24T18:42:00+5:30

रजाळवाडी येथील नवविवाहिता रेखा प्रभाकर हसे (२०) हिने शनिवारी विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोषी असलेल्या तिच्या सासरच्या ५ जणांना सिल्लोड शहर पोलिसांनी अटक केली आहे.

Five suspected to be arrested in the case of Line Laughing Death | रेखा हसे मृत्यू प्रकरणी सासरच्या ५ जणांना अटक

रेखा हसे मृत्यू प्रकरणी सासरच्या ५ जणांना अटक

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

 
औरंगाबाद/सिल्लोड : रजाळवाडी येथील नवविवाहिता रेखा प्रभाकर हसे (२०) हिने शनिवारी विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोषी असलेल्या तिच्या सासरच्या ५ जणांना सिल्लोड शहर पोलिसांनी अटक केली आहे. 
 
रविवारी रेखाच्या मृत्यू प्रकरणी सुरुवातीला आकस्मात मृत्यु ची नोंद केली होती. परंतु; रेखाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्म हत्या केल्याची तक्रार रेखाचे वडिल नत्थू ब्राह्मणे रा. जांबड़ी ता. कन्नड़ यांनी केली. यावरून पोलिसांनी  दगडुबा महादेव हसे, ध्रुपताबाई दगडुबा हासे, भगवान दगडुबा हसे, सीमा भगवान हसे, प्रभाकर दगडुबा हसे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
माहेरी पाठविलेच नाही
रेखा चे लग्न 18 में 2017 रोजी  प्रभाकर हसे याच्यासोबत झाले होते. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी तिला सतत मुंबई येथे फ्लैट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले. याच दरम्यान लग्न झाल्यापासून तिला एकदाही माहेरी पाठवण्यात आले नव्हते तसेच तिच्या पतीने दुसरे लग्न करण्याची धमकीही तील दिली होती असे रेखाच्या वडिलांनी सांगितले.

Web Title: Five suspected to be arrested in the case of Line Laughing Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.