महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

By विजय सरवदे | Published: July 7, 2023 07:54 PM2023-07-07T19:54:47+5:302023-07-07T19:55:04+5:30

माता- नवजात बालकांसाठी योजना ठरतेय संजीवनी

Five thousand for women after their first child; Now, if there is a second girl, you will get six thousand | महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरी व ग्रामीण भागात मातृ वंदना योजनेचे काम उत्कृष्टपणे राबविण्यात आल्यामुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ७० हजार ८०९ महिलांना, तर नगरपालिका क्षेत्रात ६ हजार ६१९ आणि महापालिका कार्यक्षेत्रात ४२ हजार ३१७ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे.

आता या योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली असून पूर्वी तीन टप्यात ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जात होते. आता दोन टप्प्यांत महिलांना हा लाभ दिला जाणार आहे, तर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर महिलेला एकाच टप्प्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. गर्भवती महिला व मातांचे व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मातृ वंदना योजना सन २०१७ पासून सुरू करण्यात आली.

काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना?
प्रसूतीच्या अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू करण्यात आली.

मोबाईलवर भरा ऑनलाईन अर्ज
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईलवरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पहिला हप्ता ३ हजार रुपये 
पहिल्या अपत्यावेळी आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नोंदणी व प्रसूतीपूर्व एक तपासणी केल्यास पहिला हप्ता ३ हजार रुपयांचा दिला जातो.

दुसरा हप्ता दोन हजारांचा
बाळाचे प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण झाल्यानंतर २ हजारांचा दुसरा हप्ता दिला जातो.

दुसऱ्या अपत्यानंतर सहा हजार
दुसरे बाळ जन्मल्यानंतर व ते अपत्य मुलगीच असल्यानंतर एकाच टप्प्यात ६ हजारांचा लाभ दिला जातो.

निकष काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र राहाणार नाहीत. महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. बीपीएल शिधापत्रिकाधारक, मनरेगा कार्ड जॉबधारक महिला, अनु. जाती, जमातीच्या महिला व दिव्यांग महिला असाव्यात.

जिल्ह्यात १ लाख लाभार्थी
योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात १ लाख १९ हजार ७४५ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला.

या योजनेसाठी आता सुधारित निकष आलेले आहेत. त्यामुळे नवीन नियमावलीनुसार जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. अभय धानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Five thousand for women after their first child; Now, if there is a second girl, you will get six thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.