फुकटछाप चमकोगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:16 AM2017-12-30T00:16:58+5:302017-12-30T00:17:03+5:30
शहराच्या चौका-चौकांत आपणास दादा-भाऊंचे मोठमोठे होर्डिंग, बॅनर नजरेस पडत आहेत. वाढदिवस एकाचा व त्याच्या आजूबाजूला दहा- पंधरा जणांचे फोटोे असलेल्या या होर्डिंगने पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. कारण महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे. म्हणून फुकटछाप चमकोगिरी जोमात सुरू झाली आहे.
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या चौका-चौकांत आपणास दादा-भाऊंचे मोठमोठे होर्डिंग, बॅनर नजरेस पडत आहेत. वाढदिवस एकाचा व त्याच्या आजूबाजूला दहा- पंधरा जणांचे फोटोे असलेल्या या होर्डिंगने पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. कारण महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे. म्हणून फुकटछाप चमकोगिरी जोमात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक शहरातील वॉर्डांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच महानगरपालिकेने स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र, दुसरीकडे मोठमोठे होर्डिंग व बॅनर लावून शहराच्या विद्रुपीकरणाचा जणू विडाच स्वयंघोषित ‘दादा-भाऊं’नी उचलला आहे. शहरातील बहुतांश चौकांत, दुभाजकांवर उभे, आडवे डिजिटल बॅनर सर्वांच्या नजरेस पडत आहेत. गल्ली-बोळातील दादा-भाऊला शुभेच्छा देण्यासाठी शहरांचे विद्रुपीकरण केले जात आहे. सिडकोतील कॅनॉट गार्डन, आविष्कार कॉलनी चौक असो, एन-७ असो, टीव्ही सेंटर, हडको परिसर, आकाशवाणी चौक, छावणीतील चौक, रेल्वेस्टेशन रोड, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक, जालना रोड, औरंगपुरा, कुठेही जा जिकडे तिकडे अवैधरीत्या लावण्यात आलेले शेकडो होर्डिंग दिसून येत आहेत. शहराचे विद्रुपीकरण करणाºया अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी न्यायालयाने मध्यंतरीच्या काळात कारवाईचे आदेश दिले होते. मागील वर्षात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई सुरू केल्याने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग, बॅनर गायब झाले होते, पण पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला. होर्डिंग लावणारे कोणत्या ना कोणत्या पक्षांशी जोडल्या गेले असल्याने ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ अशी स्थिती आता मनपाची झाली आहे. सर्वप्रथम चौकाचौकांतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढा, मग शहर स्वच्छता अभियान मोहीम हाती घ्या, असे खडे बोल व्यक्त होत आहेत.
अनधिकृतरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुपीकरण करणाºयांवर कारवाई करा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष क रून शहरात शेकडो अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. या विद्रुपीकरणासंदर्भात जागृती मंचच्या वतीने यापूर्वीच जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आता न्यायालयाचा अवमान केल्यामुळे चमकोगिरी करणाºया दादा-भाऊंवर खटला दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहे.
जागृती मंचच्या अध्यक्षा भारती भांडेकर यांनी सांगितले की, महानगरपालिका कारवाई करीत नसल्याने शहरात पुन्हा चमकोगिरी करणाºयांनी जागोजागी होर्डिंग लावून शहर विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आता शासनाने ‘स्वच्छता अॅप’च्या धर्तीवर ‘विद्रुपीकरण अॅप’ सुरू करावे. राज्यात जिथे जिथे अवैधरीत्या होर्डिंग लावण्यात आले असतील, सोहळे पार पडूनही वर्षानुवर्षे ते होर्डिंग एकाच जागेवर असतील, असे शहर विद्रुपीकरण करणाºयांचे फोटो नागरिकांनी त्या ‘विद्रुपीकरण अॅप’ वर लोड करावे. त्याची दखल घेऊन शासनाने कारवाई करावी, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागृती मंचच्या वतीने देण्यात येणार आहे.