जिल्ह्यात दमदार पावसाने नद्यांना पूर; विहिरींच्या पाणीपातळीतही झाली वाढ
By Admin | Published: July 28, 2016 12:21 AM2016-07-28T00:21:35+5:302016-07-28T00:44:43+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वदूर दोन तास पाऊस पडल्याची माहिती आहे.
जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वदूर दोन तास पाऊस पडल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होते. जालना, परतूर, मंठा, बदनापूर, तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६२.५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ५२.६७ टक्के पाऊस पडला.
जालना तालुक्यातील रामनगर, इंदेवाडी, विरेगाव, अंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली.
परतूर तालुक्यातही शहरासह हातडी, आष्टी, आंबा, वाटूर फाटा भागातही चांगला पाऊस झाला. अंबड तालुक्यातील शेवगा, पारनरे, शिरनेर, सोनकपिंपळगाव तसेच तालुक्यात दमदार पाऊस कोसळला. बदनापूर तालुक्यातही पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. गत आठवडाभरापासून तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे.
घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांत मंगळवारी तसेच बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली जांबसमर्थ येथून वाहणाऱ्या आनंदी नदीला पूर आला. (प्रतिनिधी)