छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात चढ-उतार, 'मे'चा शेवटचा आठवडाही 'हॉट' ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:31 AM2024-05-27T11:31:36+5:302024-05-27T11:32:37+5:30

उकाडा कायम असल्यामुळे नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.

Fluctuations in Chhatrapati Sambhajinagar temperature, last week of 'May' will also be 'hot' | छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात चढ-उतार, 'मे'चा शेवटचा आठवडाही 'हॉट' ठरणार

छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात चढ-उतार, 'मे'चा शेवटचा आठवडाही 'हॉट' ठरणार

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यातील शेवटचा आठवडा एकदम 'हॉट' जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ वर्तवित आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवार २१ मेपासून तापमानात चढ-उतार होत आहे. २३ मे रोजी पाच वर्षांतील तापमानाने रेकॉर्ड मोडले. त्यानंतर तापमान वाढतेच असून रविवारी तापमान ४१.८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस होते. उकाडा कायम असल्यामुळे रविवारी रस्त्यावरील गर्दी तुरळक होती. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात बहुतांश ठिकाणी कमी वर्दळ असल्याचे आढळले. 

मंगळवार, २१ मे रोजी कमाल तापमानाचा पारा ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला, बुधवारी ४१.४ अंश सेल्सिअस तर गुरुवारी ४३.५ अंश सेल्सिअसइतके तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदविले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक जास्त तापमानाची नाेंद गुरुवारी झाली. शुक्रवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानामुळे नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.

यंदाच्या उन्हाळ्यातील वाढलेले तापमान
५ एप्रिल : ४१.६ अंश सेल्सिअस
१८ एप्रिल : ४२.२ अंश सेल्सिअस
५ मे : ४१.६ अंश सेल्सिअस
६ मे : ४१.२ अंश सेल्सिअस
२१ मे : ४१.६ अंश सेल्सिअस
२२ मे : ४१.४ अंश सेल्सिअस
२३ मे : ४३.५ अंश सेल्सिअस
२४ मे: ४३.४ अंश सेल्सिअस
२५ मे: ४२.८ अंश सेल्सिअस
२६ मे: ४१.८ अंश सेल्सिअस

१३ दिवस ४० ते ४१ अंश सेल्सिअस ....
१ मार्च रोजी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान होते. ११ मार्चपर्यंत तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. ३१ मार्चपर्यंत ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले.१ एप्रिल रोजी ३८.८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. १६ एप्रिल रोजी ४०.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला. १८ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यानंतर २९ एप्रिल रोजी ४१.४ अंश सेल्सिअस तापमान गेले. ४ मेपासून पुन्हा तापमान ४१.६ अंश सेल्सिअस पुढे गेले. १८ मेपर्यंत तापमानात चढ-उतार राहिला. १३ दिवस तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.

Web Title: Fluctuations in Chhatrapati Sambhajinagar temperature, last week of 'May' will also be 'hot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.