फ्लायबिगचे औरंगाबाद-हैदराबाद विमान ‘जमिनीवर’; विमानसेवा अचानक केली रद्द

By संतोष हिरेमठ | Published: August 9, 2022 03:11 PM2022-08-09T15:11:15+5:302022-08-09T15:11:50+5:30

तात्पुरत्या स्वरुपात विमान रद्द केले आहे, अशी माहिती एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Flybig's Aurangabad-Hyderabad flight 'on the ground'; The flight service was suddenly cancelled | फ्लायबिगचे औरंगाबाद-हैदराबाद विमान ‘जमिनीवर’; विमानसेवा अचानक केली रद्द

फ्लायबिगचे औरंगाबाद-हैदराबाद विमान ‘जमिनीवर’; विमानसेवा अचानक केली रद्द

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
फ्लायबिग एअरलाइन्सची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा अचानकपणे दीड महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. विमान चेकिंगसाठी गेल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती फ्लायबिग एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

औरंगाबादहून १ जून रोजी फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला हैदराबादला जाणे शक्य झाले. या नव्या विमानसेवेमुळे आता सकाळी हैदराबादला जाऊन सायंकाळी औरंगाबादला परत येणे शक्य झाले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांनंतर ही विमानसेवा अचानक रद्द करण्यात आली आहे. नियमित तपासणीसाठी विमान कर्नाटकातील ‘एमआरओ’ येथे पाठविण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात विमान रद्द केले आहे, असे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Flybig's Aurangabad-Hyderabad flight 'on the ground'; The flight service was suddenly cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.