मराठवाड्यात ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांना चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:45 PM2019-05-07T18:45:49+5:302019-05-07T18:50:27+5:30

शेतकऱ्यांना जून २०१९ अखेरपर्यंत जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे.

Fodder for 4 lakh 83 thousand 911 animals in Marathwada | मराठवाड्यात ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांना चारा

मराठवाड्यात ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांना चारा

googlenewsNext
ठळक मुद्दे१०४६ पैकी ६९४ चारा छावण्या सुरू ६३ लाख जनावरांना बसताहेत दुष्काळाच्या झळा 

औैरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ पैकी ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांची ६९४ चारा छावणीत व्यवस्था करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार चारा फेब्रुवारी-मार्चपर्यंत पुरेल अशी स्थिती होती. त्यानंतर चारा टंचाईमुळे ८७५ छावण्यांना विभागीय प्रशासनाने मंजुरी दिली. त्यातील ४८१ छावण्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६७ हजार ८३३ जनावरांना चारा-पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. ४ मेपर्यंत १ हजार ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यातील ६९४ छावण्या सुरू झाल्या. त्यात ४ लाख ४४ हजार ९१९ मोठी तर ३८ हजार ९९२ लहान जनावरे आहेत. बीडमध्ये सर्वाधिक ५९९ छावण्या सुरू आहेत. ९२५ छावण्या त्या जिल्ह्यात मंजूर करण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ८१, जालना जिल्ह्यात ९ तर औरंगाबाद जिल्ह्यात ६ छावण्या सध्या सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १५, जालन्यात ११ छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना जून २०१९ अखेरपर्यंत जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो. मोठ्या जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. दुष्काळामुळे उपलब्ध चारा घटत आहे. 

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. ४१ तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाअभावी पिकांचे उत्पादन निम्म्यावर आल्यामुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. 

मराठवाड्यातील जिल्हानिहाय जनावरांची संख्या 
जिल्हा    जनावरांची संख्या    छावण्यांची संख्या    जनावरे 
औरंगाबाद    १० लाख ६७ हजार ४१२    ६    ६४२८
जालना     ६ लाख ९९ हजार २४    ८    ३४०९
परभणी     ६ लाख २२ हजार २००    ००    ००
बीड     १२ लाख २४ हजार ७९८    ५९९    ४,१६,५१०
लातूर     ७ लाख ५२ हजार ४२६    ००    ००
उस्मानाबाद     ७ लाख ३७ हजार ३४७    ८१    ५,७५,६४
नांदेड     ११ लाख ४४ हजार ७२५    ००    ००
हिंगोली     ४ लाख ५९ हजार ६८०     ००    ००
एकूण     ६७ लाख ६१२     ६९४    ४,८३,९११


36,25,490 - मोठी जनावरे विभागात
11,36,394 - लहान जनावरे विभागात
19,45,728 - शेळ्या व मेंढ्यांची संख्या 

Web Title: Fodder for 4 lakh 83 thousand 911 animals in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.