चारा-पाण्यासाठी जनावरांचीही भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:18 AM2018-12-05T00:18:42+5:302018-12-05T00:19:36+5:30
अधिकाऱ्यांची उदासीनता : वैरण, बियाणे व गाळपेरा चारा लागवड योजनेला सोयगाव तालुक्यात हरताळ
सोयगाव : तालुका पशुसंवर्धन विभागाने जानेवारीपर्यंत पुरेल एवढा चारा सोयगाव तालुक्यात उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला असला तरी जनावरांना मात्र चाºयासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेले विदारक चित्र तालुक्यात पाहावयास मिळत असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.
तालुक्यात पशुगणनेनुसार लहान जनावरे ९१६७ असून मोठ्या जनावरांची संख्या २८०५३ आहे. परंतु प्रत्यक्षात हा आकडा वाढीव असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या जुन्याच गणनेप्रमाणे या आकड्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने चाºयाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. चाºयासाठी जनावरांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याने भटकंती सुरु झाली आहे.
चाºयाच्या दुर्भिक्ष्याने सोयगाव तालुक्यातील दुष्काळाच्या झळा आणखीनच बिकट झाल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून संभाव्य चारा टंचाईच्या निवारणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैरण, बियाणे व खते आणि गाळपेरा चारा लागवडीच्या महत्वाकांक्षी योजना घेण्यात आल्या आहेत. परंतु अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे या दोन्ही योजनांना हरताळ फासल्या गेला आहे. वैरण, बियाणे योजनेत शेतकºयांना बियाणांचे वितरण करण्यात आले, परंतु पाण्याचे स्रोत बळकट नसल्याने बियाणे लागवडीची चिंता लागून आहे. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे.
मंडळनिहाय उपलब्ध चारा
मंडळ उपलब्ध चारा
सोयगाव ९६३४ मे. टन
सावळदबारा १२०९८ मे. टन
बनोटी ९००६ मे. टन
चौकट....
गाळपेरा योजनेसाठी केवळ पाच अर्ज
धरणक्षेत्र भागात उघड्या पडलेल्या गाळपेरा जमिनीत चारा पिके घेण्यासाठी मंगळवारी मुदतीच्या अंतिम दिवशी केवळ पाच शेतकºयांचे अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले आहेत. चाराटंचाईच्या उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांमुळे अपयश आले आहे. गाळपेरा योजना जनजागृतीअभावी शेतकºयांच्या हातातून निसटली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.
लागवडीयोग्य धरणे
सोयगाव, बनोटी, वरठाण, हनुमंतखेडा, अंजना, गोंदेगाव, वरखेडी, देव्हारी, धिंगापूर, काळदरी, जंगलातांडा या धरणात गाळपेरा लागवडीयोग्य क्षेत्र असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.