अँटिजेन कीट पाठोपाठ सोयगावात लसींचाही तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:04 AM2021-04-21T04:04:47+5:302021-04-21T04:04:47+5:30
एकीकडे रुग्णसंख्या वाढतच असताना दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी लागणाऱ्या किट संपल्या आहेत. आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास ...
एकीकडे रुग्णसंख्या वाढतच असताना दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी लागणाऱ्या किट संपल्या आहेत. आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास विलंब लागतो. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढीस लागला आहे. त्याचपाठोपाठ आता तालुक्यातील लसीचा साठा संपल्याने लसीकरण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोरोना नियंत्रणावरील एकमेव रामबाण लसींचा साठाही संपला असतांना लसीकरण आणि चाचण्या घेण्यासाठी आरोग्य विभागाची दमछाक होत आहे.
ऑक्सिजन यंत्रणा कोलमडली
तालुक्यात सध्या १३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जरंडी आणि निंबायतीच्या कोविड केंद्रातून ७० रुग्णांना वीस दिवसाच्या कालावधीत औरंगाबादला रेफर करण्यात आले. त्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.