लोकमत टाईम्सतर्फे औरंगाबादेत फूड फेस्टीव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:10 AM2018-01-13T01:10:32+5:302018-01-13T11:58:45+5:30

आपणास वेगवेगळे पदार्थ खाण्यास आवडतात. आपण नवनवीन चवीचे पदार्थ खाण्यास नेहमी अतुरलेले असतो. अशा अस्सल खवय्यांसाठी लोकमत टाइम्सच्या वतीने १९ ते २१ जानेवारीदरम्यान ‘फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. यात ३०० पेक्षा अधिक शाकाहारी पदार्थांच्या डिशेस असतील. हा फेस्टिव्हल खवय्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Food Festival in Aurangabad by Lokmat Tymst | लोकमत टाईम्सतर्फे औरंगाबादेत फूड फेस्टीव्हल

लोकमत टाईम्सतर्फे औरंगाबादेत फूड फेस्टीव्हल

googlenewsNext
ठळक मुद्देअस्सल खवय्यांसाठी लोकमत टाइम्सच्या वतीने १९ ते २१ जानेवारीदरम्यान ‘फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. यात ३०० पेक्षा अधिक शाकाहारी पदार्थांच्या डिशेस असतील. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना व विविध वस्तू खरेदी करताना तुम्हाला १२ राज्यांतील लोकनृत्यांचा आनंदही घेता येणार आहे.

औरंगाबाद : आपणास वेगवेगळे पदार्थ खाण्यास आवडतात. आपण नवनवीन चवीचे पदार्थ खाण्यास नेहमी अतुरलेले असतो. अशा अस्सल खवय्यांसाठी लोकमत टाइम्सच्या वतीने १९ ते २१ जानेवारीदरम्यान ‘फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. यात ३०० पेक्षा अधिक शाकाहारी पदार्थांच्या डिशेस असतील. हा फेस्टिव्हल खवय्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

क्रांतीचौक येथील हॉटेल मनोर येथे १९ तारखेपासून सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेदरम्यान शहरवासीयांना फेस्टिव्हलचा आनंद लुटता येणार आहे. लोकमत ग्रुपच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे फूड फेस्टिव्हल होय. लोकमत टाइम्सच्या वतीने एकाच छताखाली ३०० पेक्षा अधिक प्रकारच्या शाकाहारी डिशेस व पदार्थ असलेला फूड फेस्टिव्हल भरविला जात आहे. यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात फूड फेस्टिव्हल भरविण्यात आले नाही. या फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे इंदोर, जोधपूर, सूरत, कोलकत्ता, न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई व मालेगाव येथील नामांकित मास्टर शेफला आमंत्रित करण्यात आले आहे. हे मास्टर शेफ फेस्टिव्हलमध्ये साऊथ इंडियन, जोधपूर मिरची वडा, दिल्ली चाट आणि इतर नावीन्यपूर्ण पदार्थ मास्टर शेफ बनविणार आहेत. एका दिवसात संपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेणे खवय्यांना जमणार नाही यासाठी फेस्टिव्हल तीन दिवसांच करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये स्वच्छतेवर व सुरक्षेवर विशेष भर देण्यात येणार आहे. दर्जेदार पदार्थ सोबतच खवय्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाणार आहे. तसेच मेजवाणीसोबत विविध वस्तू खरेदीचाही आनंद फेस्टिव्हलमध्ये घेता येणार आहे. यात ज्वलेरी, ड्रेस, शूज आदी वस्तूचे स्टॉल असणार आहेत. याशिवाय बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, खेळाची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. यामुळे सहपरिवार, मित्रपरिवारासह या फेस्टिव्हलचा संपूर्ण आनंद सर्वांना लुटता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नेहमी नेहमी असे फूड फेस्टिव्हल भरविण्यात येत नाही. यामुळे शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

१२ राज्यांतील लोकनृत्याचे दर्शन
या फूड फेस्टिव्हलचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना व विविध वस्तू खरेदी करताना तुम्हाला १२ राज्यांतील लोकनृत्यांचा आनंदही घेता येणार आहे. यासाठी लोककलावंत शहरात येत आहेत. देशातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, विविध वस्तूंची खरेदी व लोककलेचा एकाच ठिकाणी अनुभव घेता येईल.

Web Title: Food Festival in Aurangabad by Lokmat Tymst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.