‘अंत्योदय’मधील धान्य कपातीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:40 AM2017-11-29T00:40:01+5:302017-11-29T00:40:05+5:30

केंद्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Foodgrains supply to be decreased in 'Antyodaya' | ‘अंत्योदय’मधील धान्य कपातीच्या हालचाली

‘अंत्योदय’मधील धान्य कपातीच्या हालचाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पुरवठा विभागाकडून देण्यात येत असलेल्या धान्याच्या तुलनेत निम्मा धान्यपुरवठा कमी करण्याबाबत शासन दरबारात विचार सुरू झाल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात या योजनेतून सुमारे १ कोटी ११ लाख ३२ हजार ५४९ नागरिकांना धान्यपुरवठा होतो.
७ हजार ९०४ मेट्रिक टन गहू, ५ हजार २२७ मेट्रिक टन तांदूळ, असे १३ हजार १३१ मेट्रिक टन धान्य या योजनेतून ३१ आॅक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पुरविले गेले आहे. ४ लाख ९९ हजार रेशनकार्डांवर १ कोटी ११ लाख ३२ हजार ५३९ नागरिकांना अंत्योदय योजनेतून धान्यपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय पुरवठा विभागाच्या रेकॉर्डवर आहे.
केंद्राच्या योजनेत राज्य सरकारला ढवळाढवळ करण्याचा काहीही अधिकार नाही. शेतकरी अन्नसुरक्षा योजना असा वा अंत्योदय योजना असू द्या. त्यातील कणभर धान्यदेखील कमी होता कामा नये. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ६० लाख शेतकºयांचे अन्न सुरक्षा योजनेतून पुरविले जाणारे धान्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ हजार कोटी रुपयांचा सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सगळा प्रकार शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. सरकार असे निर्णय घेत असेल, तर त्याचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतील. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील तक्रार करण्याचा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Foodgrains supply to be decreased in 'Antyodaya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.