Football match to be played in Aurangabad for social reconciliation; Police Commissioner's Initiatives
औरंगाबादमध्ये सामाजिक सलोख्यासाठी आज रंगणार फुटबॉल सामना; पोलीस आयुक्तांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:11 PM2018-06-20T14:11:58+5:302018-06-20T14:22:54+5:30
शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी विविध समाजातील तरुणांमध्ये पोलीस आयुक्तांच्यावतीने आज फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
औरंगाबाद : शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी विविध समाजातील तरुणांमध्ये पोलीस आयुक्तांच्यावतीने आज फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर हा प्रदर्शिनीय सामना होईल.
शहरात मागील काही दिवसांमध्ये विविध कारणांवरून हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामुळे घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोख्यास बाधा पोहोचली. शहरात सामाजिक सलोखा आणि एकता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेत आज विविध समाजाच्या तरुणांच्या फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले आहे. हा प्रदर्शिनीय सामना आज दुपारी २ ते ५ यावेळेत देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानात खेळविण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त, सिडको प्रशासक आणि पोलीस उपायुक्त हे उपस्थिती राहणार आहेत.
यावेळी सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर टी - शर्ट व फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Web Title: Football match to be played in Aurangabad for social reconciliation; Police Commissioner's Initiatives