मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग
By संतोष हिरेमठ | Published: June 15, 2023 08:26 PM2023-06-15T20:26:27+5:302023-06-15T20:27:23+5:30
महिलेच्या हाती स्टेअरिंग पाहून प्रवासीही भारावून गेले.
छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारी पहिल्यांदाच महिला चालकाने छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड आणि सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर प्रवाशांची वाहतूक केली. महिलेच्या हाती स्टेअरिंग पाहून प्रवासीही भारावून गेले.
रमा गायकवाड असे या महिला चालकाचे नाव आहे. मिळाला. एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होण्यासाठी महिलांना गेली ३ वर्षे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. बसस्थानकात रूजू झाल्यानंतरही वाहक म्हणून काम करावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० जून रोजी सविस्तर वृत्तही प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने चालक म्हणून महिलांना कर्तव्य देण्याचे नियोजन केले.
मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारी सकाळी ११: ३० वाजता रमा गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड मार्गावरील बसचे ‘स्टिअरिंग’ हाती घेतले. वाहक म्हणून रोहिणी खेडकर होत्या.