विदेशी पाहुण्या दिंडीत तल्लीन !

By Admin | Published: February 4, 2017 12:39 AM2017-02-04T00:39:37+5:302017-02-04T00:40:45+5:30

लातूर : जपानच्या सहा पाहुण्या बुधवारी नाथ संस्थानच्या पायी दिंडीत सहभागी झाल्या़

Foreign tourists engrossed with the promise! | विदेशी पाहुण्या दिंडीत तल्लीन !

विदेशी पाहुण्या दिंडीत तल्लीन !

googlenewsNext

लातूर : डोक्यावर तुळसकुंड घेऊन मुखी ज्ञानोबा- तुकाराम, ज्ञानोबा- तुकाराम... असे नामस्मरण करीत जपानच्या सहा पाहुण्या बुधवारी नाथ संस्थानच्या पायी दिंडीत सहभागी झाल्या़ त्यामुळे दिंडीत सहभागी वारकरी, महिलाही आचंबित झाल्या.
औसा येथील श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची माघवारी पायी दिंडी पालखीसह पंढरपूरकडे रविवारी निघाली आहे़ या दिंडीत सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, डॉ़ रुद्रप्पा धाराशिवे यांच्यासह हजारे वारकरी व महिला आहेत़ मजल- दरमजल करीत ही दिंडी जात आहे़ दरम्यान, बुधवारी या दिंडीत जपानच्या निका योगिकावा, कियोमी सिनोदा यांच्यासह अन्य चार विदेशी पाहुण्या सहभागी झाल्या़ या जपानच्या पाहुण्यांनी उंबरेगव्हाण (जि़ उस्मानाबाद) पर्यंत पाच किमीचा पायी प्रवास केला़

Web Title: Foreign tourists engrossed with the promise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.