बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली कशी बशी बचावली, शोधार्थ वन विभागाचे पथक धामोरी शिवारात
By साहेबराव हिवराळे | Published: October 14, 2023 03:00 PM2023-10-14T15:00:57+5:302023-10-14T15:02:23+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली कशी बशी बचावली; परंतु परिसरातील शेतकरी सध्याही धास्तावलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : गत सोमवारी आईसोबत चाललेल्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. शेतकऱ्यांनी चिमुकलीची सुटका केली. त्या बिबट्याच्या शोधात वन विभागाचे पथक धामोरी व इतर शिवारांत फिरत आहे. जखमीवरील उपचाराचा खर्च वन विभाग देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुलीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. वन विभाग हा खर्च देणार असल्यामुळे त्या कुटुंबाला थोडा आधारच मिळणार आहे. चिमुकली कशी बशी बचावली; परंतु परिसरातील शेतकरी सध्याही धास्तावलेले आहेत.
वन विभाग सतर्क असून, पैठण हद्दीवर हा परिसर आहे. त्याच परिसरात अशी अन्य घटना घडलेली नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी हातात काठी घेऊन तसेच मोबाइलवर गाणी वाजवत जावे किंवा कीर्तन लावावे, अशी जनजागृती वन विभाग करत आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर कवठे यांनी सांगितले.