दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:54 AM2021-11-29T11:54:44+5:302021-11-29T11:58:07+5:30

Corona Virus : राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास वसुली

Forget Corona for two hundred rupees; allowed to cross the state border without RTPCR, vaccination | दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona Virus In Maharashtra ) नव्या म्युटंट (उत्परिवर्तित प्रकाराचे) आणि तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच प्रवासाची मुभा दिली जात आहे (allowed to cross the state border without RTPCR, vaccination by giving money) . हीच संधी साधून राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास दोनशे, पाचशे रुपयांची वसुली करून ये-जा करण्याची मुभा दिली जात आहे. हा प्रकार कोरोना वाढीला हातभार लावणारा ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

कोरोनाच्या नवीन म्युटंट ‘ओमिक्राॅन’च्या धास्तीने राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भातील नवीन नियमावली शनिवारी जारी करीत निर्बंध कडक केले. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेल्यांपैकी दोन प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी समोर आले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर प्रवाशांकडे आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल विचारला जातो. त्याबरोबरच लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्रही विचारले जाते. ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही, त्यांना एक तर परत पाठविणे अथवा जागेवर अँटिजन तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, असे काहीही होत नाही. प्रतिप्रवासी दोनशे ते पाचशे रुपये उकळले जातात. सोलापूर- भैरूनगी - इंडी (कर्नाटक), अक्कलकोट-गाणगापूर (कर्नाटक) रस्त्यावर हा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. लसीकरण, आरटीपीसीआर प्रमाणपत्राची विचारणा करणारे अगदी साध्या गणवेशात, पायात चप्पल घातलेले लोक पाहायला मिळतात. एखादा कर्मचारी खाकीतील असतो.

काय आहे धोका ?
लस न घेतलेले नागरिक, आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र नसलेले नागरिक अगदी सहजपणे ये-जा करीत आहेत. म्हणजे राज्यासह इतर राज्यांतही नागरिक लसीचा एकही डोस न घेता जात असल्याचा प्रकार होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले जात आहेत; परंतु पैशांच्या जोरावर सीमा भागांत होणारा बिनधास्त वावर कोरोनावाढीच्या दृष्टीने महाग ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

Web Title: Forget Corona for two hundred rupees; allowed to cross the state border without RTPCR, vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.