मच्छीमार संस्थेचा वार्षिक ठेका माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:04 AM2021-08-27T04:04:57+5:302021-08-27T04:04:57+5:30
तुकाराम वानखेडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री पशुपालन व मत्स्यविकास पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेऊन त्यांना मच्छीमारांचे विविध ...
तुकाराम वानखेडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री पशुपालन व मत्स्यविकास पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेऊन त्यांना मच्छीमारांचे विविध मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे नागरिकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला आहे. विशेषतः मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मच्छीमार व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक टंचाईमुळे तलावाचा ठेका भरणे अवघड झाले आहे. यामुळे मागील दोन वर्षांचा ठेका माफ करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव वानखेडे-चिंचोलीकर, राष्ट्रीय महासचिव दादाराव आळणे आदींची उपस्थिती होती.
फोटो : केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना मागणीचे निवेदन देताना नेवपूर मच्छीमार संस्थेचे चेअरमन तुकाराम वानखेडे.
260821\img-20210813-wa0317.jpg
पशुपालन व मत्स्यविकास केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांना मागणीचे निवेदन देताना, नेवपूर मच्छिमार संस्थेचे चेअरमन तुकाराम वानखेडे,