औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:28 PM2020-09-02T12:28:25+5:302020-09-02T12:30:45+5:30

रामकृष्णबाबा पाटील वैजापूर विधानसभेचे सलग दहा वर्ष आमदार आणि औरंगाबादचे खासदार राहिले होते.

Former Aurangabad MP Ramkrishna Baba Patil passes away | औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन

औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद : माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे सकाळी ६.३० वाजता निधन जाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी ४ वाजता दहेगाव ता. वैजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामकृष्णबाबा यांना मागील आठवड्यापासून मधुमेहाचा त्रास होऊ लागल्यामुळे शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. 

२ सप्टेंबर १९३६ ला दहेगाव ( जि. औरंगाबाद ) येथे रामकृष्ण जग्ग्नाथ पाटील यांचा जन्म झाला. दहावी उत्तीर्ण रामकृष्णबाबांचे शेती आणि सहकार या विषयातील ज्ञान आणि अनुभव मोठा होता. सहकारातून पुढे आलेले रामकृष्णबाबा १९७८- ८० या काळात पंचायत समितीचे सभापती होते. १९८५ ते १९९५ या काळात ते वैजापूर मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते १९९५ ला खासदार झाले. या दरम्यान केंद्रात कृषी व अर्थविषयक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. तब्बल २५ वर्षे ते औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले. 

Web Title: Former Aurangabad MP Ramkrishna Baba Patil passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.