माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 PM2021-03-04T16:30:45+5:302021-03-04T16:32:16+5:30

फरजाना यांना बेशुद्धावस्थेत बुधवारी पहाटे ४.४५ वाजता जफर बिल्डर आणि छोटू कुरेशी यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.

Former corporator's wife commits suicide by drinking poison | माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष पिऊन आत्महत्या

माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष पिऊन आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देजिन्सी ठाण्यात मृत्यूची नोंद पत्नीने दिली होती पतीविरुद्ध तक्रार

औरंगाबाद : एमआयएममधून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक शेख जफर शेख अतहर ऊर्फ जफर बिल्डर यांच्या तिसऱ्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेने आत्महत्या केली अथवा तिचा घातपात झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

फरजाना शेख असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, फरजाना यांना बेशुद्धावस्थेत बुधवारी पहाटे ४.४५ वाजता जफर बिल्डर आणि छोटू कुरेशी यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटीत उपचारादरम्यान फरजाना यांचा सकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. फरजाना यांचे घाटीत नाव नोंदविताना जफर बिल्डर यांनी तिचे नाव सय्यद फरजाना सय्यद अयुब असे वडिलांच्या नावासह नोंदविले.

फरजाना या जफर बिल्डर यांची तिसरी पत्नी होत्या. त्यांनी २०१७ साली जफर बिल्डरविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली होती. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यात तडजोड घडवून आणली होती. फरजाना आणि जफर यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. या मुलीच्या नावावरून दोघांत तणाव होता. याविषयी मृत महिलेने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते. यातूनच फरजाना यांनी आज पहाटे विष प्राशन केले.

शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे
फरजाना यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू विष प्यायल्याने झाल्याचा अहवाल पोलिसांना दिल्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Former corporator's wife commits suicide by drinking poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.