शिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी खासदारांकडे मागितला विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:54 PM2019-07-09T23:54:58+5:302019-07-09T23:55:29+5:30

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून खासदारपदी आरुढ झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे सेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी चक्क ५० लाख रुपये विकास निधीची मागणी केली आहे. सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून जलवाहिनीसाठी निधी मागितल्याने एमआयएमच्या भुवया उंचावल्या आहेत. आता इम्तियाज जलील विकास निधी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Former Deputy Mayor of Shivsena asked the MPs Development Fund | शिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी खासदारांकडे मागितला विकास निधी

शिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी खासदारांकडे मागितला विकास निधी

googlenewsNext
ठळक मुद्देजलवाहिनीसाठी ५० लाख द्या : मनपाच्या आर्थिक स्थितीमुळे काम करणे अशक्य


औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून खासदारपदी आरुढ झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे सेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी चक्क ५० लाख रुपये विकास निधीची मागणी केली आहे. सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून जलवाहिनीसाठी निधी मागितल्याने एमआयएमच्या भुवया उंचावल्या आहेत. आता इम्तियाज जलील विकास निधी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वॉर्ड क्र. ११० मयूरबन कॉलनीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या स्मिता घोगरे यांनी भाजपच्या उमेदवार स्वाती संजय जोशी यांचा ३८३ मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर घोगरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत १५ महिन्यांसाठी त्यांना उपमहापौरपदही दिले होते. मागील काही वर्षांपासून घोगरे सेनेत सक्रियही आहेत. महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. विकासकामे होत नाहीत, म्हणून सर्वच पक्षांचे नगरसेवक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेनेचे नगरसेवकही या समस्येतून सुटलेले नाहीत. सत्ता असूनही नसल्यासारखी अवस्था सेना नगरसेवकांची आहे. वॉर्डातील विकासकामे मार्गी लागावी म्हणून सेनेचे पदाधिकारी कधीच बैठक घेत नाहीत. अधिकाऱ्यांना सूचनाही देत नाहीत. त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे वाटत असल्याचे अनेक नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सेनेच्या नगरसेविका तथा माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांना शंभूनगर येथे जलवाहिनी टाकायची आहे. त्यासाठी त्यांनी मनपा आयुक्त, अधिकारी सर्वांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. शेवटी काम झालेच नाही. दरवेळी निधीचे कारण समोर करून फाईल बाजूला ठेवण्यात आली. शेवटी घोगरे यांनी सोमवारी थेट नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांच्याकडे जलवाहिनीसाठी ५० लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती एमआयएममधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शंभूनगर भागात सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक राहतात. त्यांच्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आता इम्तियाज जलील सेनेच्या माजी महापौरांना विकास निधी देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदारांचा विकास निधी मिळावा म्हणून अगोदर एमआयएमचे नगरसेवक रांगेत आहेत.
नागरिकांची गरज लक्षात घेणार
खासदार हा संपूर्ण जिल्ह्याचा असतो. विविध पक्षांचे नगरसेवक विकास निधीची मागणी करतात. शंभर टक्के घोगरे यांच्या पत्राचा विचार करण्यात येईल. नागरिकांची गरज लक्षात घेऊन काम करण्यात येईल. नगरसेवक कोण हा विचार अजिबात होणार नाही.
इम्तियाज जलील, खासदार

Web Title: Former Deputy Mayor of Shivsena asked the MPs Development Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.