वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

By योगेश पायघन | Published: October 3, 2022 03:10 PM2022-10-03T15:10:30+5:302022-10-03T15:13:29+5:30

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती.

Former Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university senate member Fulchand Salampure's PhD suspended over allegations of cheating | वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

googlenewsNext

औरंगाबाद-वाड्मय चौर्याच्या आरोपावरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या २०१३ च्या पीएच.डी ला परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तब्बल ९ वर्षांनी स्थगिती दिली आहे.

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती. त्यात प्रा. सलामपुरे यांनी २०१३ च्या समाजशास्त्र विषयात संशोधनासाठी डाॅ. शिवाजी भागानगरे यांच्या अर्थशास्त्र विषयातील २०११ च्या संशोधनाची नक्कल केलेली असून हे काॅपी राइट ॲक्टचे उल्लंघन डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी. रद्द करून संशोधक व मार्गदर्शकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. २३ जुलै रोजी युजीसीच्या मार्गदर्शक सुचेनेनुसार कुलगुरूंनी आयएआयपी समिती नेमली. त्या समितीच्या चौकशी अहवालानंतर ६ सप्टेंबर, १४ सप्टेंबर रोजी पीएचडी विभागाकडून डाॅ. सलामपुरे यांना लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी २९ सप्टेंबर रोजी सादर केलेला लेखी खुलासा असमाधानकार असल्याने तो नाकारण्यात आल्याने ही कारवाई केल्याचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाच्या पत्रात म्हटले आहे.

असा आहे ठराव ?
सत्य निष्ठा व वाड्मय चौर्य नियम २०१८ मधील कलम १२.२ नोट २ मधील तरतुदीनुसार तत्काळ प्रभावाने पीएचडी स्थगित ठेवून. महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२८ (३) मधील तरतुदीनुसार पुढील कारवाईचा ठराव परीक्षा व मुल्यमापन बैठकीने घेण्यात आला आहे.

पुढे काय होणार ?
चाैकशीच्या समितीच्या अहवालनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळ बैठकीसमोर सादर खुलासा अमान्य करण्यात आला. यासंबंधी घेतलेला ठराव विद्या परीषद आणि व्यवस्थापन परीषदेतील निर्णयानंतर विद्यापीठ कायद्यातील १२८-३ अनुसार पुढील कार्यवाहीसाठी कुपपतींकडे पाठवण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी म्हटले आहे.

केवळ कुलगुरू येवले यांची आकसबुद्धि
मी २००० मध्ये एमएच्या आधारे नोकरीस लागलो. २००७ मध्ये युजीसीने एमफिलमध्ये सुट दिली. त्या यादीत माझे नाव आहे. २०११ ला छत्रपती शाहू महाराज यांच्यावर पहिली पीएचडी केली. २०१३ ला २००७ च्या माझ्या एमफिलचा विषय वाढवून दुसरी पीएचडी केली. माझ्या विरोधात तक्रार करणारा १२ वी नापास आहे. समितिला सर्व कागदपत्रे, वस्तुस्थिती सांगितली. तरीही जाणीवपूर्वक माझे म्हणणे ग्राह्य न धरता पीएचडी स्थागितीचा एकतर्फी निर्णय घेतला. ही केवळ कुलगुरू येवले यांची आकसबुद्धि आहे. ज्या कायद्यानुसार कारवाई केली जात आहे तो कायदा माझ्या पीएचडी नंतर २०१८ चा कायदा आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य असतांना मी परीक्षा नियंत्रक निवड समितीत होतो. त्यांच्या चुकीच्या निवडीला विरोध केला. अकॅडमीक ऑडीट कमिटीत असून गेल्या दोन वर्षातील १५ ते २० बैठकांना मला बोलावण्यात आलेले नाही. त्या एसी रूममधील बैठकांच्या निर्णयांना विरोध केला. कुलगुरूंविरोधात पत्रकार परीषद घेतली. त्यामुळेच माझ्याविरोधात सुडबुद्धीने वागत आहेत.
-डाॅ. फुलचंद सलामपुरे, माजी व्यवस्थापन परीषद सदस्य

Web Title: Former Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university senate member Fulchand Salampure's PhD suspended over allegations of cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.