शेजाऱ्यांच्या भांडणाचा त्रास होतो म्हणून तरुणांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 06:59 PM2018-12-03T18:59:24+5:302018-12-03T19:00:21+5:30

शेजारी राहणाऱ्या तीन भावंडांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

Former military soldier's death in youth's assault at aurangabad | शेजाऱ्यांच्या भांडणाचा त्रास होतो म्हणून तरुणांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू 

शेजाऱ्यांच्या भांडणाचा त्रास होतो म्हणून तरुणांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू 

googlenewsNext

औरंगाबाद : तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो, असे म्हणून शेजारी राहणाऱ्या तीन भावंडांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील सदानंदनगरात घडली. या घटनेप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बबन कुंडलिक मगरे (वय ४६)असे मृताचे नाव आहे.  सातारा  पोलिसांनी सांगितले की, बबन मगरे हे माजी सैनिक असून ते सातारा परिसरातील सदानंदनगरात पत्नी आणि चार मुलांसह राहातात.बबन यांना दारूचे व्यसन होते. ते दारूच्या नशेत सतत पत्नी गोदावरी यांना भांडण करायचे. त्यांच्या शेजारीही दणके हे माजी सैनिक राहतात. दणके यांना राजेश दणके, रूपेश दणके आणि योगेश दणके ही तीन तरूण मुले  आहेत. ते खाजगी नोकरी करतात. गेल्या काही महिन्यांपासून मगरे आणि दणके परिवारात किरकोळ कारणावरून कुरबुर होत असते. 

महिनाभरापूर्वी दणके कुटुंबातील पाच जणांनी बबन मगरे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी मगरे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो. गल्लीत अशांतता पसरते. आम्ही नीट झोपू शकत नाही,अशी तक्रार दणके कुटुंब करायचे. दणके कुटुंबांच्या तक्रारींकडे  बबन मगरे हे दुर्लक्ष करीत. २ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बबन मगरे हे त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून जोरा-जोरात भांडत होते. या भांडणाचा आवाज  ऐकून राजेश, रुपेश आणि योगेश दणके हे मगरे यांच्या घरी लाठ्या,काठ्या घेऊन आले. त्यांनी मगरे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. 

या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मगरे हे रक्ताने माखले. त्यानंतर त्यांची मुले त्यांना घेऊन सातारा ठाण्यात गेली.सातारा पोलिसांनी त्यांना लगेच मेडिकल मेमो देऊन उपचार करण्यासाठी घाटी रुग्णायलात पाठविले. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मगरे यांना घाटीत दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली. 

Web Title: Former military soldier's death in youth's assault at aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.