माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण
By मुजीब देवणीकर | Published: August 5, 2022 03:25 PM2022-08-05T15:25:45+5:302022-08-05T15:26:34+5:30
लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही माजी आमदार जाधव यांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी अचानक महापालिकेसमोर उपोषण सुरु केले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
औरंगाबाद महापालिका राज्यात सर्वात जास्त कर आकारते अशी टीका कायम होत असते. कराच्या रक्कमेच्या तुलनेत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. रस्ते, पाणी आणि कचरा याची समस्या काही केल्या सुटत नाही. एकीकडे स्मार्ट सिटीचे काम आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधा आणि कर या विषय माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हातात घेतला आहे. जाधव यांनी आज अचानक महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
माजी आमदार जाधव यांनी अचानक सुरु केलेल्या उपोषणाची चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आंदोलनामुळे जाधव देखील निवडणुकीत आपले समर्थक उतरवणार का? असेही चर्चा आता सुरु झाली आहे.