'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:57 PM2022-07-07T12:57:42+5:302022-07-07T12:57:56+5:30

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदरांना इशारा दिला आहे.

Former Shiv Sena MP Chandrakant Khaire has warned Shiv Sena rebel MLAs. | 'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद

'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद

googlenewsNext

औरंगबाद- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. 

संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. 

आता बंड केलं ना...मग यापुढे शिवसेनेबद्दल कोणतही विधान करु नये, ही माझी त्यांना सक्त ताकीद आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं. त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करु, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तसचे आम्ही बाळासाहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत, असंही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार, असं सांगत धनुष्यबाण आपलाच आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणं शक्य होते, तेवढं दिलं. मात्र त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू- आमदार दीपक केसरकर

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

Read in English

Web Title: Former Shiv Sena MP Chandrakant Khaire has warned Shiv Sena rebel MLAs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.