शिवसेनेचे माजी खासदार कांबळे भाजपच्या वाटेवर

By Admin | Published: August 27, 2014 01:25 AM2014-08-27T01:25:23+5:302014-08-27T01:37:28+5:30

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीबापू कांबळे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Former Shiv Sena MP Kamble is on the road to BJP | शिवसेनेचे माजी खासदार कांबळे भाजपच्या वाटेवर

शिवसेनेचे माजी खासदार कांबळे भाजपच्या वाटेवर

googlenewsNext


विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीबापू कांबळे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कांबळे यांनी मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई येथे या अनुषंगाने चर्चा केली असून, कांबळे यांचा भाजपामध्ये लवकरच अधिकृत प्रवेश होणार असल्याचे समजते.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरूंग लावण्याचे काम कांबळे यांनी केले होते. १९५१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिवाण राघवेंद्र श्रीनिवासराव यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९५७ मध्ये व्यंकटराव श्रीनिवासराव हे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले. १९६२ आणि त्यानंतर १९६७ आणि १९७१ अशा तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्याच तुळशीराम आबाजी पाटील यांनी विजयश्री मिळविली होती. १९७७ च्या निवडणुकीत तुकाराम सदाशिव शृंगारे तर १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्र्यंबक मारुतीराव सावंत हे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर अरविंद कांबळे यांनी १९८४, १९८९ व १९९१ असे सलग तीन टर्म काँग्रेसची सत्ता कायम राखली. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद कांबळे पुन्हा विजयी झाले. मात्र अवघ्या अकरा महिन्यांत पुन्हा मतदारांना लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले. यात शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कानिफनाथ देवकुळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अरविंद कांबळे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर शिवसेनेची उमेदवारी कल्पना नरहिरे यांच्याकडे आली. या दरम्यान शिवाजी कांबळे शिवसेनेतही फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान मंगळवारी शिवाजी कांबळे यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी चर्चा केल्याची माहिती प्राप्त झाली असून, कांबळे यांचा भाजपामध्ये प्रवेश जवळपास निश्चित समजला जात आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याच्या अनुषंगाने माजी खासदार शिवाजीबापू कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी मुंबई येथे भेट झाली मात्र यावेळी भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचे कांबळे यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश करणार असेन तर तुम्हाला निश्चित माहिती देऊ, असे सांगत फडणवीस यांच्याशी झालेली बैठक रुटीन असून, त्यात इतर खाजगी विषयावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान याबाबत भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, शिवाजी कांबळे भाजपाच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Former Shiv Sena MP Kamble is on the road to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.