३५० संशयित कुष्ठरुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:49 AM2017-09-11T00:49:17+5:302017-09-11T00:49:17+5:30
पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांचे निदान करून त्यांना उपचाराखाली घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. व्ही.एल. परतवाघ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोधाच्या विशेष मोहिमेत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तथा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, अंगणवाडी सेविका, आशा व स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाले यांच्या प्रमुख उपस्थितीत वडेपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ५ सप्टेंबर रोजी या मोहिमेस प्रारंभ झाला. मोहिमेअंतर्गत ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार संशयित रूग्ण शोधण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
एकूणच या मोहिमेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून ५ दिवसांमध्ये जवळपास ३५० रूग्ण आढळले आहेत. या संशयित रूग्णांचे निदान करून त्यांना विनाविलंब आणि विनामूल्य उपचाराखाली घेण्यात येत आहे. वडेपुरी येथे झालेल्या कार्यक्रमास लक्ष्मण पाटील बोडके, दळवी यांच्यासह अनेकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. व्ही. आर. मेकाले यांनी कुष्ठरोगाची लक्षणे आणि त्यावरच्या उपायाची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते़
या मोहिमेत परभणीचे कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. बायस, नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्याम नागापूरकर, कंधार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे, डॉ. मुंढे, डॉ. आईटवाड व सर्व जिल्हास्तरावरच्या अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.