लाखोंचा गंडा घालणाऱ्या चीटफंडचे सूत्रधार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:37 AM2017-07-23T00:37:59+5:302017-07-23T00:43:48+5:30

नांदेड: शहरातील श्रीनगर भागात के़विरेन साई चिटफंड प्रा़ लि़ मध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा

The founder of lakhs of moneylender cheating | लाखोंचा गंडा घालणाऱ्या चीटफंडचे सूत्रधार अटकेत

लाखोंचा गंडा घालणाऱ्या चीटफंडचे सूत्रधार अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरातील श्रीनगर भागात के़विरेन साई चिटफंड प्रा़ लि़ मध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चिटफंडच्या दोन सूत्रधारांच्या भाग्यनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या़ हैदराबाद येथे हे आरोपी लपून बसले होते़ गेल्या अनेक दिवसांपासून भाग्यनगरचे पोउपनि चंद्रकांत पवार त्यांच्या मागावर होते़
काबरानगर येथील ज्योती केरबा जिंके यांनी २१ मार्च २०१७ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याबाबत पहिली तक्रार दिली होती़ जिंके यांनी विरेन चिटफंडमध्ये गणेश चंद्रय्या कमटम, मुरली चंद्रय्या कमटम, व्यंकटेश मत्ती, महेश मत्ती, नरेश कमटम, संध्या गणेश कमटम यांनी विश्वासात घेऊन चिटफंडमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते़ त्यानुसार जिंके यांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली़ ही रक्कम एक वर्षात दुप्पट करुन देतो असे आश्वासन संचालक गणेश कमटम याने दिले होते़ दर महिन्याला जिंके यांच्याकडून पैसे जमा करुन घेण्यात आले़ जून २०१६ मध्ये जिंके यांना तीन लाख रुपयांची बीसी लागली़ तेव्हा ही रक्कम न देता पुन्हा दुप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याबदल्यात अभ्युदय बँकेचा धनादेश जिंके यांना देण्यात आला़ हा धनादेश बँकेत न टाकण्यासही सांगण्यात आले, परंतु याबाबत संशय आल्यानंतर जिंके यांनी पैशाची मागणी केली असता, चिटफंडकडून टाळाटाळ करण्यात येत होती़ त्यानंतर त्यांनी या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ चौकशीत चिटफंडमध्ये मदन बाळासाहेब राऊत यांनी ७ लाख, दशरथ पांडुरंग गंगातिरे ५० हजार, सुनील शंकरअप्पा धाडे १ लाख, रामा मुंजाजी गच्चे २ लाख ९० हजार, शांताबाई रामा गच्चे ४ लाख अशा प्रकारे जवळपास १८ लाख ४० हजार रुपयांची ठेवीदारांनी गुंतवणूक केल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर पोलिसांनी मुरली चंद्रय्या कमटम (राफ़रांदेनगर), महेश रामलू मत्ती (रा़दयानंदनगर) यांना पकडले़ सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत़ पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींच्या बँक खात्यांची माहिती काढली़ त्यावेळी चिटफंडमधील पैसे त्यांनी मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर गुंतविल्याचे पुढे आले़ तसेच अन्यही काही जणांना अशाच प्रकारे गंडविले असून हा आकडा ७५ लाख १२ हजार ८०० रुपयापर्यंत पोहोचला़ घटनेनंतर फरार आरोपीच्या मागावर पोउपनि चंद्रकांत पवार गेल्या अनेक दिवसांपासून होते़ त्याबाबत माहिती मिळताच या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या़

Web Title: The founder of lakhs of moneylender cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.