आळंद शिवारातून चार जनावरे चोरीला, शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:04 AM2021-09-16T04:04:57+5:302021-09-16T04:04:57+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंद येथील जाहेद बेग यांची गावापासून काही अंतरावर गट क्र. ४६५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंद येथील जाहेद बेग यांची गावापासून काही अंतरावर गट क्र. ४६५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेले दोन बैल, एक गाय व एक वासरू अशी चार जनावरे अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सकाळी सहा वाजता जाहेद बेग हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना जनावरे गोठ्यात दिसली नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. काही अंतरावर बैलांच्या गळ्यातील घागरमाळ सापडल्याने जनावरे चोरी झाल्याचे निश्चित झाले. वडोद बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. बीट जमादार दत्ता मोरे यांनी पंचनामा करून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला. सपोनि आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्ता मोरे हे करीत आहेत.
-------------
एका महिन्यात दोन चोऱ्या
गेल्या महिन्यात आळंद येथील सतीश चौधरी, भाऊसाहेब खिल्लारे यांच्या मालकीच्या ४५ हजार रुपये किमतीच्या आठ शेळ्या व चार मेंढ्या चोरीला गेल्या होत्या. या घटनेतील चोरट्यांचा अद्यापही तपास लागला नाही. तोच मंगळवारी मध्यरात्री पुन्हा चोरी झाली आहे.