सुधारगृहातून चार मुलांचे पलायन
By Admin | Published: May 4, 2016 12:11 AM2016-05-04T00:11:26+5:302016-05-04T00:17:56+5:30
लातूर : शहरातील लेबर कॉलनीतील बाल सुधारगृहातून चार मुलांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
लातूर : शहरातील लेबर कॉलनीतील बाल सुधारगृहातून चार मुलांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. या चौघांना वेगवेगळ््या घटनेत येथे ठेवण्यात आले होते. या प्रकरणी मंगळवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील लेबर कॉलनी येथे असलेल्या बाल सुधारगृहात विविध गुन्ह्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांना ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी सुधारगृहातील कर्मचाऱ्यांना चकवा देत चौघांनी येथून धूम ठोकली. या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणी सुधारगृहाचे निरीक्षक नितीन रामेश्वर शिंदे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल सुधारगृहातून हे चौघे कसे पळाले? हे कोडे न उलगडणारे आहे. सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच या मुलांनी पलायन केल्याची चर्चा आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह़़़
बाल सुधार गृहातील सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे़ तरीही मुलं कशी पळाली, का सुरक्षा नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़