चार अपघातांत ४ ठार

By Admin | Published: May 14, 2017 10:43 PM2017-05-14T22:43:12+5:302017-05-14T22:57:43+5:30

बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले.

Four deaths in four accidents | चार अपघातांत ४ ठार

चार अपघातांत ४ ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले. बीडसह गेवराई, केज व माजलगाव येथे या घटना घडल्या.
बीड शहारातून जाणाऱ्या अहमदनगर राज्य रस्त्यावरील एका हॉटेलसमोर कार (क्र. एमएच २३ एडी - ७७७३) च्या धडकेने दुचाकीवरील (क्र. एमएच १२ बीयू- ७१५३) सोमनाथ हिरालाल पिसाळ (४५ रा. शहाजानपूर ता. बीड) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी संजय सोमनाथ पिसाळ यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मनोरुग्ण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. सुरेश रामराव संकोळ (३५ रा. तानाजीनगर, माजलगाव) असे मयताचे नाव आहे. तो कोणत्याही वेळी कुठेही फिरत असे. घळाटवाडी फाट्याजवळ त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ पंडित खोडवे हे करीत आहेत.
तिसरी घटना केज - अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळफाटा येथे रविवारी घडली. अंबाजोगाईहून केजकडे निघालेल्या जीपने दुचाकी (एमएच २३ डी ६१०८) ला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील त्रिंबक मरीबा पोटभरे (६५, रा. कोद्री, ता. केज) हे जागीच ठार झाले. युसूफवडगाव ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा नोंद झाला.
गेवराई तालुक्यातील रानमळा फाटा येथे वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपचे (एमएच १६ एबी १६४८) रविवारी टायर फुटले. त्यानंतर जीप उलटली. यात रामचंद्र राठोड, द्वारका राठोड, ओम राठोड, प्रयागा राठोड, ललिता राठोड (सर्व रा. रूई भारडी, ता. अंबड, जि. जालना) हे पाचजण जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Four deaths in four accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.