आग विझविताना चार वनकर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:51+5:302021-04-23T04:05:51+5:30

घोसला/ सोयगाव : अजिंठ्याच्या डोंगराला लागलेला वणवा नियंत्रणात आणताना वनविभागाचे चार कर्मचारी जखमी झाले आहे. ही घटना घोसला शिवारात ...

Four forest workers injured while extinguishing the fire | आग विझविताना चार वनकर्मचारी जखमी

आग विझविताना चार वनकर्मचारी जखमी

googlenewsNext

घोसला/ सोयगाव : अजिंठ्याच्या डोंगराला लागलेला वणवा नियंत्रणात आणताना वनविभागाचे चार कर्मचारी जखमी झाले आहे. ही घटना घोसला शिवारात बुधवारी रात्री घडली.

घोसला शिवारातील अजिंठा डोंगरात अचानक वणवा पेटला. ही माहिती मिळताच बनोटी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही आग जोगेश्वरी व इंद्रगढी मंदिराच्या खाली अति तीव्र उतार व दुर्गम ठिकाणी लागली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. सपकाळ, वनपरिमंडळ अधिकारी अनिल पाटील हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. सदर आगीचे ठिकाण अतिशय तीव्र उतार, खोल कडा-कपारी व दुर्गम असल्यामुळे वनकर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी पोहोचणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत वनविभागाने १०-१२ जणांचे तीन पथक तयार केले व नियोजनपूर्वक सर्व बाजूने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यात चार कर्मचाऱ्यांचे हात भाजून ते जखमी झाले. यानंतरही न थांबता वनविभागानेही गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणली. अखेर पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यास वनविभागाला यश आले.

कोट

जोगेश्वरी व इंद्रगढी मंदिराच्या खाली अति तीव्र उतार व दुर्गम ठिकाणी आग लागली होती. आग विझविण्यासाठी वनविभागाच्या पथकाने खूप परिश्रम घेतले. यात ४ कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कोट

इंद्रगढीचा परिसर हा अतिशय तीव्र उतार व खोल कडा-कपारींचा असून दुर्गम आहे. त्याठिकाणी पोहचून आग विझविणे अतिशय मोठे आव्हान व धोकादायक होते. तरीदेखील जीवाची पर्वा न करता नियोजनपूर्वक तीन पथके तयार करून आग नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

-राहुल सपकाळ,

वनपरिक्षेत्र अधिकारी, सोयगाव

कोट

आग विखुरलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यावर नियंत्रण करणे अवघड होते. तरीदेखील माघार न घेता वन कर्मचाऱ्यांनी पूर्ण शर्थीने रात्रभर आग विझविली आहे. त्यामुळे खूप मोठी वनसंपदा व वन्यजीवांची होणारी हानी टळली आहे.

- अनिल पाटील, वनपरिमंडळ अधिकारी, बनोटी

छायाचित्र ओळ : घोसला शिवारात डोंगराला लागलेली आग.

220421\ynsakal75-0553205320_1.jpg

घोसला शिवारात डोंगराला लागलेली आग.

Web Title: Four forest workers injured while extinguishing the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.