शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:02 AM2021-05-26T04:02:11+5:302021-05-26T04:02:11+5:30

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात ...

Four, including three youths, committed suicide in the city | शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात शिकाऊ डॉक्टर, चिकलठाणा येथे अभियंता तर मकई गेटजवळ राहणारा पदवीधर तरुण आणि मुकुंदवाडी परिसरात ५० वर्षीय मजुराचा यात समावेश आहे.

शिकाऊ डॉक्टरने मृत्यूला कवटाळले

सातारा परिसरातील ज्योती प्राईड सोसायटीतील रहिवासी सागर महेंद्र कुलकर्णी (२१) याने मंगळवारी सकाळी ११:३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर हा लातूर येथील एका डेंटल कॉलेजमध्ये बी.डी.एस. चे शिक्षण घेत होता. त्याला स्क्रिझोफेनिया हा आजार झाल्यामुळे तो काही महिन्यांपासून घरी आला होता. औरंगाबाद येथील एका खासगी डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. तो बरा झाल्याचे दिसत असताना मंगळवारी त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलले. आवाज देऊनही तो खोलीचे दार उघडत नाही म्हणून त्याच्या आईने शेजारी राहणाऱ्या सुधीर जाधव यांना बोलावले. त्यांनी दार तोडून पाहिले असता सागरने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी त्याला तातडीने घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. सागरचे वडील घाटी रुग्णालयात नोकरीला आहेत. मोठा भाऊ पुण्यात इंजिनिअर आहे. तर आई गृहिणी आहे.

=============

तरुण अभियंत्याची आत्महत्या

चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे विलास शामराव जगताप (२७) या अभियंत्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातील छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात हलविले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी ९ वाजता त्याला तपासून मृत घोषित केले. अत्यंत हसत खेळत राहणाऱ्या विलासने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्याला दोन विवाहित मोठ्या बहिणी आहेत. त्याचे वडील सुतारकाम करतात. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यापासून तो नोकरीच्या शोधात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला.

पदवीधर तरुणाची आत्महत्या

मकई गेटजवळ राहणाऱ्या इमरान खान मुकिम खान (२७) याने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इमरानला एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसह तो राहात होता. तो पदवीधर होता. मात्र तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

=================

मजुराची आत्महत्या

भगीरथ आप्पासाहेब वावरे (५०, रा. अहिल्यानगर, मुकुंदवाडी परिसर) यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता बाथरूमच्या छताला रॉड लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नजरेस पडताच नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वावरे यांना घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वावरे हे मजुरी काम करायचे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाला. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

Web Title: Four, including three youths, committed suicide in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.