चार दिवसात विद्यापीठाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 07:26 PM2021-05-13T19:26:42+5:302021-05-13T19:30:20+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad गेल्या चार दिवसात चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

Four lakh students of the university took the online exam in four days | चार दिवसात विद्यापीठाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा

चार दिवसात विद्यापीठाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देबीए, बीकॉम'चा मे अखेरपर्यंत निकाल जाहीर होणारबीएस्सीचा निकाल जूनमध्ये

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. गेल्या आठवडयात ३ ते ७ मे या काळात जवळपास १ लाख विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर चालू आठवडयात १० ते १२ मे या काळात अनुक्रमे ४५ हजार २२९ , ६५ हजार ९०८ व ६७ हजार ६१० अशा १ लाख ६८ हजार ७४७ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर गुरूवारी (दि.१३) सकाळच्या सत्रात ७७ हजार ५५ तर दुपारच्या सत्रात ९ हजार ९५ अशी एकुण ८६ हजार १०० जणांनी परीक्षा दिली. तर ‘मार्च-एप्रिल‘मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए , बी.एस्सी व बी.कॉम द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्या आहेत. तर या तीनही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच पदव्यूत्तर महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होत आहेत. सोमवारपासून विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बी.ए (इंटरनॅशनल जर्नालिझम), बी.एस्सी (नेटवर्विंâग अ‍ॅण्ड हार्डवेअर), बीएस्सी ( अॅनिमेशन) तसेच बी.कॉम (ई-कॉमर्स) या चार अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले आहेत. बी.ए व बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल मे अखेपर्यंत घोषित होतील. तर बी.एस्सी अभ्यासक्रमाचे निकाल जून महिन्यात घोषित होणार आहेत.पदवीच्या परीक्षा २५ मे राजी तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २ जून रोजी संपणार आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. 

चार दिवसात अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
गेल्या आठवडयात ३ ते ७ मे या काळात जवळपास १ लाख विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर चालू आठवडयात १० ते १२ मे या काळात अनुक्रमे ४५ हजार २२९ , ६५ हजार ९०८ व ६७ हजार ६१० अशा १ लाख ६८ हजार ७४७ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर गुरूवारी (दि.१३) सकाळच्या सत्रात ७७ हजार ५५ तर दुपारच्या सत्रात ९ हजार ९५ अशी एकुण ८६ हजार १०० जणांनी परीक्षा दिली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्वच परीक्षा ऑनलाईन सुरु आहेत. गुरुवारी (दि.१३) ऑनलाईन परीक्षेत कसलीही अडचण आली नाही, अशी माहिती डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

Web Title: Four lakh students of the university took the online exam in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.