कुख्यात चावल्यासह चार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:58 AM2018-06-20T00:58:35+5:302018-06-20T00:59:01+5:30

वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या सर्तकतेमुळे फसला.

Four Martingale with Notorious Bawl | कुख्यात चावल्यासह चार जेरबंद

कुख्यात चावल्यासह चार जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या सर्तकतेमुळे फसला. साजापूर परिसरात लपून बसलेल्या कुख्यात चावल्या ऊर्फ नितीन काळेसह तीन अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून, एक दरोडेखोर पसार झाला. या टोळीकडून एअरगनसह घातक शस्त्रास्त्रे व दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
चावल्या ऊर्फ नितीन काळे (३०), अमोल भिवसणे (२०), दत्तू पिंपळे (२२), सर्व रा. जोगेश्वरी व नितीन राजपूत (२३, रा. वाळूज) अशी या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. या टोळीचा चावल्या काळे हा म्होरक्या असून, त्यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी, वाळूज, गंगापूर, वैजापूर, शिल्लेगाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा आदी पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. चावल्या सराईत गुन्हेगार असून तो एमपीडीएखाली स्थानबद्ध असलेल्या धन्या पिंपळे याचा साथीदार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर सासुरवाडीच्या (दहीगावणे, ता. शेवगाव) आश्रयाला जात असल्याची कबुली चावल्याने दिली. विविध गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर चावल्या हा न्यायालयातही हजर राहत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वारंटही जारी आहे. अंधाराचा फायदा घेऊन सय्यद शरीफ (२७, रा. रांजणगाव) हा दरोडेखोर पळाला. या दरोडेखोरांची अंगझडती घेतली असता पोलिसांना एअरगन, लोखंडी कोयता, धारदार तलवार, सुताची दोरी, लोखंडी गज, मिरची पूड आदी दरोडा टाकण्याचे साहित्य सापडले. पोलीस पथकाने पकडलेले दरोडेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून दरोडे व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक साबळे यांनी वर्तविली आहे.

Web Title: Four Martingale with Notorious Bawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक