जिल्ह्यातील चार पालिकांत नवे गडी, नवे राज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 11:57 PM2017-01-06T23:57:02+5:302017-01-06T23:58:51+5:30

उस्मानाबाद :परंडा, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या चार पालिकांच्या विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या

Four new municipal corporations, new Raj! | जिल्ह्यातील चार पालिकांत नवे गडी, नवे राज !

जिल्ह्यातील चार पालिकांत नवे गडी, नवे राज !

googlenewsNext

उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वीच उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. या निवडीनंतर आता विषय समिती सभापतींच्या निवडींची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील परंडा, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या चार पालिकांच्या विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या. तर गणपुर्तीअभावी भूम पालिकेतील सभापतींच्या निवडी होऊ शकल्या नाहीत.
नळदुर्ग पालिकेच्या नियोजन व विकास समिती सभापती उपनगराध्यक्ष नितीन कासार, पाणीपुरवठा समिती सभापती दयानंद बनसोडे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती म्हणून बसवराज धरणे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भारती बनसोडे, बांधकाम समिती सभापतीपदी काजी आसिफा बेगम नजर अहमद यांची निवड झाली आहे. यावेळी स्थायी समितीचेही गठण करण्यात आले. नगराध्यक्ष रेखाताई जगदाळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उमरगा पालिकेतील विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी ११ वाजता सभागृहात बैठक झाली. यावेळी स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी प्रेमलता टोपगे, बांधकाम समिती सभापतीपदी हंसराज गायकवाड, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी विक्रम मस्के, महिला व बाल विकास समिती सभापतीपदी शिल्पा शिंदे, नियोजन, कर संकलन व शिक्षण समिती सभापतीपदी सविता वाघमारे, आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतीपदी महेश माशाळकर यांची वर्णी लागली. दरम्यान शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांसह सात सदस्यांनी निवडीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, भूम पालिका सभापतींच्या निवडीही शुक्रवारीच होणार होत्या. परंतु, गणपूर्तीअभावी त्या होऊ शकल्या नाहीत.
परंडा नगर परिषद
परंडा नगर परिषदेत पिठासीन अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शहाबर्फीवाले नसरीन बाशा, बांधकाम सभापतीपदी दखनी खुर्शिद बेगम जमील, पाणीपुरवठा सभापतीपदी शेख जुलेखा जब्बार, वाचनालय समिती सभापतीपदी रत्नमाला राहुल बनसोडे तर स्थायी समिती सभापतीपदी सौदागर म. जाकीर म. इस्माई यांची वर्णी लागली आहे. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका मुख्याधिकारी डॉ. मिताली संचेती यांचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Four new municipal corporations, new Raj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.