छत्रपती संभाजीनगरच्या मनपा शाळा दत्तक घेण्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

By मुजीब देवणीकर | Published: October 26, 2023 12:36 PM2023-10-26T12:36:22+5:302023-10-26T12:36:43+5:30

प्रशासनाला आणखी प्रस्ताव येण्याची अपेक्षा

Four proposals received for adoption of municipal schools of Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या मनपा शाळा दत्तक घेण्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

छत्रपती संभाजीनगरच्या मनपा शाळा दत्तक घेण्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या शाळा दत्तक घ्याव्यात, यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण विभागाकडे चार प्रस्ताव दाखल झाले आहेत. चारही प्रस्ताव पश्चिम मतदारसंघातील असून, आणखी प्रस्ताव यावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

राज्य शासनाने शाळा दत्तक देण्याचे धोरण स्वीकारले, त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली. महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्यासाठी ही योजना आणली आहे. शासनाच्या या धोरणाला शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. दत्तक धोरण रद्द करावे, अशी मागणी होत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पुढाकार घेतला असून, इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाच्या शिक्षण विभागाकडे चार प्रस्ताव आले आहेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी सुरू आहे. उद्योजक, सेवाभावी संस्थांना, दानशूर व्यक्तींना पालिकेतर्फे आवाहनही करण्यात आले आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी नारेगाव येथील शाळा दत्तक घेतली आहे.

महापालिका शाळांचा तपशील
मराठी माध्यमाच्या शाळा – ४६
द्विभाषीय शाळा (मराठी आणि उर्दू) – ०८
उर्दू माध्यमाच्या शाळा – १७

Web Title: Four proposals received for adoption of municipal schools of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.