चार वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रभारी
By Admin | Published: August 26, 2015 12:39 AM2015-08-26T00:39:05+5:302015-08-26T00:46:49+5:30
गंगाराम आढाव ,जालना जिल्ह्यातील चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पद मागील काही दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहेत. जालन्यात नियुक्त झालेल्या काही अधिकाऱ्यांनी जालना
गंगाराम आढाव ,जालना
जिल्ह्यातील चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पद मागील काही दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहेत. जालन्यात नियुक्त झालेल्या काही अधिकाऱ्यांनी जालना येथे येण्यास अनुत्सुकता दाखविली. असे दोन पदे, एका पदावर अद्याप कोणाचीच नियुक्ती नल्याने, एक अधिकारी रजेवर असल्याने या पदावर प्रभारी अधिकारीच सांभाळत आहे.
जिल्ह्यातील तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या २७ मे रोजी करण्यात आल्या होत्या. त्यात जालना येथील उपअधिक्षक (गृह) ईश्वर वसावे यांची धुळे येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून तसेच भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल गायकवाड यांची भोईसर (मुंबई) येथे, अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख यांची बाळापूर जि.अकोला येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कर्जत येथील उपविभागीय अधिकारी धिरज पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
या निर्णयाप्रमाणे उपअधिक्षक वसावे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल गायकवाड, विक्रात देशमुख हे बदलीच्या ठिकाणी रूजू झाले. मात्र जालन्यात बदली झालेले अहमदनगर येथील कर्जत मधील उपविभागीय अधिकारी धिरज पाटील हे अद्याप बदलीच्या ठिकाणी जालन्यातील अंबड येथील उपविभागीय अधिकारीपदी नियुक्त झालेले नाहीत. ते जालन्यात येण्यास इच्छूक नसल्याचे समजते. त्यांच्या जागेवर पोलिस निरीक्षक देशमुख यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे.
जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदासाठी एका पोलिस निरीक्षकांनी आपली वर्णी लागावे म्हणून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयात सुरू होती. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची नियुक्ती होवून दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या काळात जालना गुन्हे शाखेने अनेक गुन्हे उघडकीस आनलेले आहे.
४विशेष म्हणजे दरोडा, चोरीचा मुद्देमाल मोठ्याप्रमाणात जप्त करून तो माल संबधीताना दिलेला आहे. मोटारसायकल चोरी असे गुन्हे उघडकीस आनले. एकीकडे ही चांगली कारवाई पाठीशी असतानाच शहरातील एका पोलिस निरीक्षकाने गुन्हे शाखेचे पद मिळावे म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान एकीकडे वरिष्ठ अधिकारी जाल्यात बदली होवून ही येथे येण्यास अनुत्सूक आहे. तर दुसरीकडे गुन्हे शाखेच्या रिक्त नसलेल्या पदासाठी एका पोलिस निरीक्षकाकडून मोर्चेबाधणी सुरू करण्यात आली आहे.