MIDC मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात चौघे गंभीर जखमी, वेल्डरचा तुटलेला तळपाय ५० फुटावर आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 17:17 IST2021-12-18T17:15:26+5:302021-12-18T17:17:20+5:30
वाळूज एमआयडीसीमधील प्रभाकर इंजिनेरिंगच्या समोरील शेडमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

MIDC मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात चौघे गंभीर जखमी, वेल्डरचा तुटलेला तळपाय ५० फुटावर आढळला
वाळूज ( औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीमधील प्रभाकर इंजिनेरिंगच्या समोरील शेडमध्ये दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करताना गॅस वेल्डिंग सिलेंडरचा भीषण स्फोट झाला ( Gas Cylinder explosion in Waluj MIDC ). यात वेल्डर, दुचाकीचालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी अडीज वाजेच्या दरम्यान घडली.
असद चाऊस यांचे रांजणगाव चौकात प्रभाकर इंजीनेरिंगच्या समोर गॅस वेल्डिंगचे शेड आहे. आज दुपारी अडीज वाजेच्या सुमारास सुनील देवरे आपल्या दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करण्यासाठी असद यांच्या शेडमध्ये आले. दरम्यान, वेल्डिंग सुरु असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात वेल्डर असद, दुचाकीचालक सुनील देवरे, शेजारील शेख चांद, गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत.
पायाचा पंजा ५० फुट दूर आढळला
हा स्फोट ऐवढा भीषण होता की, वेल्डर हसन यांचा तुटलेला तळपाय ५० फुट दूर आढळून आला. स्फोटाच्या ठिकाणी वाहनाचे आणि सिलेंडरचे विखुरलेले तुकडे आढळून आले. यासोबतच दुचाकीचालक आणि शेजारील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.